Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गावस्तरीय कोरोना दक्षता व लसीकरण समित्या होणार गठीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीत होणार समित्या गठीत ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृतीचा प्रशासनाचा उपक्रम अनिल गंपावार - आमचा विदर्भ ताल...

  • राजुरा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीत होणार समित्या गठीत
  • ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृतीचा प्रशासनाचा उपक्रम

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यास आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो तसेच लस घेण्यासाठी केंद्रांवर होत असलेल्या गर्दीत कोणी कोरोनाबाधित असल्यास आपल्यालाही कोरोनाची लागण होईल या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर येत नसल्याची बाब समोर आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘मिशन मोड’ ही लसीकरण मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत आता राजुरा तालुक्यातील ६५ ग्राम पंचायतीत गावस्तरीय कोरोना दक्षता व लसीकरण समित्या गठीत होणार आहे. 

कोविड १९ चा वाढता पादुर्भाव रोखण्याकरिता गावस्तरीय कोरोना दक्षता व लसीकरण समित्या गठीत करण्यात याव्या अश्या सूचना १६ मे रोजी मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून प्राप्त झाल्या. १ जून रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची व्हिडीओ कॉन्फेरंस सभेतही यावर चर्चा झाली. त्यात गावस्तरीय कोरोना दक्षता व लसीकरण समित्या गठीत करून त्यात खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

या समितीत गावचा सरपंच-अध्यक्ष, ग्रामसेवक-सचिव, तलाठी, ग्रापं उपसरपंच, सर्व ग्रापं सदस्य, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, अंगणवाडी व मदतनीस, कोतवाल, महिला बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे सर्व सदस्य राहणार असून उपरोक्त समितीस ग्रापं कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणे, प्रतिबंधनात्मक क्षेत्राची देखभाल करणे तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल व ग्रामीण भागातही आता लसीकरणाचा वेग वाढेल अशी असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात असलेला गैरसमज दूर व्हावा यासाठी प्रशासनाने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असून नक्कीच जनजागृती होणार आहे.
अमित महाजनवार - पंस विस्तार अधिकारी, राजुरा 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top