Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेतीतस्करीचे सहा ट्रॅक्टर जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संग्रहित छायाचित्र अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - सध्या रेतीतस्करांना सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ...

संग्रहित छायाचित्र
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सध्या रेतीतस्करांना सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षतपणामुळे तस्करांना मोकळे रान मिळत आहे. धिडशीच्या तलाठ्याने पहाटे धिडशी व मारडा नाल्यावर धडक देत सहा ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. सोबतच नदी पात्रातील खड्यांचे मोजमाप करून एक हजार ब्रास रेतीचा दंड वसूल करण्याचा अहवाल दिला. तालुक्यातील विहीरगाव, मूर्ती, विरूर, खांबाडा, बेरडी, टेम्बुरवाही, कापणगांव, सुमठाना, सास्ती, गोवरी, देवाडा आदी नाल्यावर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरु असून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. वर्धा नदीच्या धिडशी व मारडा घाटातून रेती उपसा होत असल्याचे लक्षात येताच तलाठी विनोद खोब्रागडे यांनी त्यावर पाळत ठेऊन पहाटे नदीपात्रात धडक देत सहा ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. या धडक कार्यवाहीने रेती तस्करांचे धाबे दणाणले असून दबंग तलाठी विनोद खोब्रागडे यांची धास्ती आता रेतीतस्करांवर बसली आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top