Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेच...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.विनाताई मालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा ला रुग्णवाहिकेची नितांत गरज होती जि.प.सदस्या विनाताई मालेकर यांनी वेळीवेळी आमदार सुभाष धोटे, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे पाठपुरावा करून नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळवून घेतली.

सदर रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याला कोरपणा पंचायत समितीच्या उपसभापती सौ.सिंधुताई आस्वले, श्याम रणदिवे माजी सभापती तथा सदस्य पं.स. कोरपना, आरोग्य अधिकारी स्वप्नील टेंभे, सुरेश पा मालेकर समाजसेवक, मिलिंद ताकसांडे ग्रा.प.सदस्य नारंडा तथा संजय गांधी निराधार सदस्य कोरपना, प्रकाश मोहूर्ले युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top