Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वृक्षारोपण करू या, पर्यावरणाचे रक्षण करून मानवी जीवन सुरक्षित करू या - जेसी अंकुशसिंह चौहान
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्य JCI राजुरा प्राईड द्वारे वृक्षारोपण जेसी सदस्यांनी उचलली वृक्ष संगोपनाची जबाबदारी अनिल गंपावार - आमचा विदर्भ ताल...

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्य JCI राजुरा प्राईड द्वारे वृक्षारोपण
  • जेसी सदस्यांनी उचलली वृक्ष संगोपनाची जबाबदारी
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्‍या भावनेतून प्रत्‍येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्‍यासाठी आपापल्‍या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन JCI राजुरा प्राईडचे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून JCI राजुरा प्राईड द्वारे टीचर्स कॉलनी येथे वृक्षारोपण करण्यात आले. जेसी सदस्यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी उचलत वृक्ष लागवड केली व दरवर्षी लावत असलेल्या व सध्या मोठे झालेल्या वृक्षांचा आढावा घेतला. यावेळी परेडचे संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा, माजी अध्यक्ष जेसी व्यंकटेश गड्डम, सचिव जेसी जहीर लखानी, जेसी शारदा गड्डम व परिसरातील महिला उपस्थित होत्या. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top