Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाढदिवसाचे गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन प्रेयसीवर अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स बल्लारपूर - प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ...

  • अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बल्लारपूर -
प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर मध्ये घडली.  आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नावे सन्मुखसिंग बुंदेल वय २५ रा. बल्लारपूर असे नाव आहे. या युवकाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगत कारवा जंगलात नेले. या ठिकाणी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. यानंतर फेसबुकवर बनावट खाते काढून अत्याचाराचे सर्व व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले.

प्रियकराने सोशल मीडियावर केलेल्या या संतापजनक प्रकरानंतर पीडित मुलीने पोलिसांत जाऊन तक्रार नोंदविली. प्रियकर हा पीडितेला जातीवाचक शब्दात बोलायचा. आरोपीच्या या लज्जास्पद वागणुकीमुळे पीडितेनं आरोपीला लग्नास नकार दिला होता अश्यातच प्रेमात मिठाचा खडा पडला. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सुडाची भावना मनात ठेवत आरोपीने ऐन वाढदिवसी गिफ्ट देण्याचा बहाणा करत जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हि घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून सन्मुखसिंग बुंदेलला याला अटक करत त्याविरुद्ध अत्याचार, अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत आहे. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top