Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुऱ्यात वीज पडून महिलेचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आज दुपारी दोन वाजताची घटना अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आज दुपा...

  • आज दुपारी दोन वाजताची घटना
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे येथील रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत असलेल्या भाग्यश्री धनराज वाढई या 30 वर्षीय महिलेवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजुरा शहरातील अंबादास नगर येथील धनराज वाढई हे पत्नीसह रेल्वे पुला लगतच्या शेतात काम करीत होते. त्याचवेळी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला व पत्नी भाग्यश्री धनराज वाढई ही झोपडीकडे जात असतानाच तिच्या अंगावर वीज पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृतक महिलेला 6 ते 7 वर्षाचे दोन मुले आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटूंबावर शोककळा पसरली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top