- ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट त्याच नागरिकांना पेट्रोल
- नेर पोलीस, आरोग्य विभागाची संयुक्त कार्यवाही
यवतमाळ -
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान बघता आगोदर पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता No Mask, No Fuel योजना सुरु करण्यात आली होती. आता चक्क नेर पोलीस, आरोग्य विभागाने संयुक्त कार्यवाही करत येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला आलेल्या ग्राहकांची कोरोना अँटिजन चाचणी केली. कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट ज्या नागरिकांकडे आहे त्यांनाच पेट्रोल पंपावर पेट्रोल देण्यात येत आहे. ज्यांनी कोरोना चाचणी केलेली नाही त्यांची कोरोना अँटिजन चाचणी पेट्रोल पंपाच्या कार्यालयात नेर पोलीस व आरोग्य विभागा द्वारे करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांची कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आली अश्याच ग्राहकांना पेट्रोल दिल्या जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या अशी चाचणी सुरु असल्याचे सूत्राने सांगितले. या मोहिमेत किती लोकांची चाचणी करण्यात आली व किती लोक पॉजिटीव्ह आले हा आकडा माञ मिळू शकला नाही.
छान जबरदस्त
उत्तर द्याहटवा