- स्वेच्छा रक्तदानाचा आज सहावा दिवस
- आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम
चंद्रपूर -
कोरोनाच्या संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरी कडे लसीकरण मोहिमेमुळे रक्तदात्यांत, रक्तदान करता येते किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे. साधारणत: लसीकरणाच्या १४ दिवसांनंतर रक्तदान करता येत असून समाजाचे ऋण फेडण्यासाठी रक्तदान करा असे आवाहन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते आयएमए सभागृह येथे शुक्रवार दि. ४जून ला आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार परिवार तर्फे आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष रुद्रनारायन तिवारी यांची तर अतिथी म्हणून भाजपा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, डॉ. साने मॅडम, रामकुमार अकापेलिवार, मयूर चहारे, शुभम शेंगमवार यांची उपस्थिती होती.
यावेळी रुद्रनारायन तिवारी यांनी, रक्तदानासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत, मानवी शरीरातील रक्तच मनुष्याच्या उपयोगी येते असे विशेषत्वाने नमूद केले. प्रास्ताविकात कासंगोट्टूवार यांनी रक्तदान शिबिर आयोजनाची भूमिका विशद केली. गोहिल गुरले, अतुल मेश्राम, अमोल गोवर्धन, सुमिता गोटेफोडे, राघवेंद्र सिंह, अनिल डोंगरे, राजेश गौरदीपे यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज ५ ते १० रक्तदाते निमंत्रित करीत असल्याची माहीती विघ्नेश्वर यांनी दिली.
यावेळी सर्व रक्तदात्यांना आ मुनगंटीवार यांचे वतीने मान्यवरांच्या हस्ते घड्याळ, मास्क व सॅनेटायझर भेट स्वरूप देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार व्यक्त प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले यशस्वीतेसाठी आ सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचे संजोजक दत्तप्रसंन्न महादानी, राहुल पावडे, विशाल निंबाळकर आदी परिश्रम घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.