Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहरातील रस्ते जलमय ; शेत शिवारात पाणी साचले शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या...

  • शहरातील रस्ते जलमय ; शेत शिवारात पाणी साचले
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या हप्त्यात पावसाने कोरपना तालुक्यात जोरदार सुरुवात केली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने एक तास जोरदार तडाखा दिल्याने शहरातील रस्ते जलमय झालेत तर ग्रामीण भागातील शेत शिवारात पाण्याचे तळे निर्माण झाले. दरम्यान शेतीला पूरक असे पाऊस पडल्याने शेतकरी तर शेतीच्या मशागती लागला असून वरुणराजाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी दादाने समाधान असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. रोहिणीचा हा पाऊस सर्वदूर झाला नसल्याने शेतकरी परत पावसाच्या प्रतीक्षेत आपल्या शेतात बी बियाणे खते बियाणांची जुळवाजुळव केली असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सोयाबीन व खतांचा तुटवडा निर्माण झाला असला तरी मागणीनुसार बियाणे उपलब्ध होणार की नाहीत या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. दरम्यान गेल्या चार दिवसापासून तालुक्यात ढगाळ वातावरण असून आज शुक्रवार ला तब्बल एक तास जोरदार पावसाने तडाखा दिल्याने शहरासह तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतीच्या कामात लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेत.  







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top