Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ग्राम सुरक्षा दल कागदावरच ? अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - तालुक्यातील गावा गावातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी व गावात शांतता सलोखा निर्माण करण्...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -

तालुक्यातील गावा गावातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी व गावात शांतता सलोखा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल नेमण्यात आले.  मात्र ग्रामसुरक्षा दलाकडून अमलबजावणी होतं नसल्याने हे ग्राम सुरक्षा दल केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. कोरपना तालुक्यातील ग्रामीण भागातील अवैद्य धंदे यांच्या विरोधात प्रशासनाने ग्राम सुरक्षा स्थापन करून अवैद्य व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते यावेळी अनेक गावाल ग्रामसुरक्षा दल स्थापन केले असले, तरी फक्त कागदोपत्री हे असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ग्राम सुरक्षा दलामध्ये सर्वत्र आलबेल सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे गावातील शांतता नष्ट होत आहेत. ग्रामसुरक्षा दल मध्ये कार्यरत असणारे तरुण हे काम करण्यास उत्साही असले तरी पोलिस प्रशासन याबाबत अद्याप शांत आहे. अवैध व्यवसाय नंबर एमडीपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होणार असून पोलिस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाने याला सावधपणे कारवाई केली तर कोरपना तालुका आणि जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद होण्यास फारसा वेळ लागणार नाहीत गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावेत यासाठी नागरिकांनी जागृत असणे गरजेचे आहेत. अवैध व्यवसाय चालत असलेल्या ठिकाणांची माहिती पोलीस या प्रशासनाने ग्रामसुरक्षा दल मध्ये तंटामुक्त समितीला तात्काळ दिली पाहिजे तसेच गावात राहणाऱ्या पोलीस विभागांचा विश्वासू तसेच पोलीस विभागाचा कर्मचारी शासनाचा पगार घेतो असा पोलीस पाटील यांनी गावातील चालणाऱ्या कामकाजाची माहिती देणे गरजेचे असताना याकडे पोलिस पाटील दुर्लक्ष करीत  फक्त शासनाच्या पगार उचलण्याचा व्यस्त आहेत गावातील  समित्यांमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य असतात यांना विशेष अधिकार देण्यात झाले आहेत मात्र अनेक गावात हे कागदोपत्रीच असून गावात अवैध व्यवसाय जोरात चालू आहेत ग्रामसुरक्षा दलामध्ये मागील वर्षी याच पोलीस पाटील संघटनेने पगार वाढविण्यास संबंधित कोरपना पोलीस स्टेशनला निवेदन दिले ते काम कमी पगार जास्त अशी अवस्था असताना  गावात पोलीस विभागांचा कर्मचारी असताना हे अवैध व्यवसाय चालतो तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहेत तेव्हा गावातील ग्रामसुरक्षा दल तंटामुक्त समिती पोलीस पाटील यांनी समन्वय साधून यावर अंकुश लावण्यात यावा अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील अहवाल पोलिस पाटलांना मागावा तेव्हा त्यांचा मानधान द्यावा अशीही मागणी ग्रामपंचायत स्तरावरून गावकऱ्यांनी केली आहेत.  










Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top