Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे वाटर फिल्टर तर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्राथमिक आरोग्य उप केंद्र धानोली येथे सॅनिटायझर मशीन माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रति...

  • प्राथमिक आरोग्य उप केंद्र धानोली येथे सॅनिटायझर मशीन
  • माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

कोरपना तालुक्यातील आदिवासीं दुर्गम भागात माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार याच्या संकल्पनेतून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारचे यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल,प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळावे या उद्देशाने वाटर फिल्टर भेट देण्यात आले,तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धानोली तांडा येथे सॅनिटायझर मशीन माजी आमदार संजय धोटे यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाली, दिनांक 4 जून 2021 ला माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 

याप्रसंगी चनई सरपंच अरुण मडावी, धानोलीचे सरपंच विजय रणदिवे, मांडवाचे सरपंच सौ संगीता तलांडे, भाजपा शाखा अध्यक्ष कोरपना अनिल कौरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ.शालिनी तरोने, भाजयुमो जिल्हा सचिव ओम पवार, जगाजी सोयाम, ज्योतीराम मंगाम, गणपत मडावी, विपुल मुनावत, आरोग्य सेवक जे.डी.शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी माजी अँड आमदार संजय धोटे यांनी ग्रामीण भागातील कोविड लसीकरण जनतेनेन घाबरता लस घेण्याची आव्हान केले, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा येथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे त्याठिकाणी सूचना केल्या, धानोली तांडा ग्रामपंचायत व प्राथमिक उपकेंद्र येथील कामकाजाबद्दल सरपंच विजय रणदिवे आरोग्य सेवक शिंदे यांचे कौतुक करून अभिनंदन केले, डॉ.शालिनी तरोने यांच्या कुशल आरोग्य सेवेबद्दल सुद्धा जनतेच्या वतीने आभार मानले गावातील नागरिक आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 








About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top