Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथे जागतिक पर्यावरण दिन संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महावि...

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा तसेच पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे सचिव अविनाश जाधव हे अध्यक्ष म्हणून तर राजुरा विभागाचे उपविभागीय वन अधिकारी अमोल गरकल हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तसेच संस्थेचे संचालक साजिद बियाबानी, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. सदर प्रसंगी विविध जातीचे रोपटे लावण्यात आले. तसेच  महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पर्यावरणाचे महत्व व त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून कोरोना संक्रमण स्थितीमध्ये संपूर्ण भारतभर ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे वृक्षांची आठवण सर्वांना प्रकर्षाने जाणवली. सर्वांनी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे, नैसर्गिक साधन संपत्ती जसे पाणी, विज इत्यादींचा काळजीपूर्वक वापर करावा. असे आवाहन विविध उदाहरणे देऊन वनपरिक्षेत्र अधिकारी गरकल  यांनी केले. त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व प्राचार्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रभाकरराव मांमुलकर साहेब यांच्याच प्रेरणेतून दरवर्षी पर्यावरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अध्यक्षीय भाषणातून अविनाश जाधव यांनी उपस्थितांना पाण्याचे महत्व, ऑक्सिजनचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे विविध फळांचे बियाणे तसेच आंबा, पेरू, चिंच, जांभूळ इत्यादीचे बि फेकून न देता ते उन्हाळ्यात जपून ठेवावे व पावसाचे वातावरण झाल्यानंतर परिसरात किंवा रस्त्याच्या कडेने टाकल्यास मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र वाढेल असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला. महाराष्ट्र वन विभागाने दोन हेक्टर एवढी वन नसलेली जमीन वनी करनाकरिता उपलब्ध करून दिल्यास संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातर्फे दरवर्षी सदर जागेवर वृक्षारोपण करून व वृक्ष संवर्धन करून संस्थेतर्फे पर्यावरण चा समतोल राखण्यासाठी मोठे कार्य करण्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक शंभरकर यांनी केले तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख विठ्ठल आत्राम यांनी मानले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top