Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पर्यावरण संतूलन राखणे काळाची गरज - प्रा.धनंजय डवरे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जागतिक पर्यावरण दिनानिमित्य खंडोबा देवस्थान येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण धनगर समाज संघटना चे आयोजन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्...

  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्य खंडोबा देवस्थान येथे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण
  • धनगर समाज संघटना चे आयोजन
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
मानवाने आपले जीवन समृद्ध करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन आपले जीवन सुसमृद्ध करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरणात अनेक बदल केले. वाहतुकीसाठी रस्ते, राहण्यासाठी घरे, शेती, धरणे अशा अनेक घटकांची निर्मिती केली व करीत असून या सर्व घटकांचा परिणाम पर्यावरणावर होताना दिसतो. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होत जाणारा र्‍हास व त्याचे सजीव सृष्टी व मानवी जीवनावर होणारे परिणाम आज आपल्याला अनुभवायला मिळतात.

आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून (निसर्गातून) होत असते हे आपल्याला माहिती असूनसुद्धा पर्यावरण संवर्धनाकरीता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थीवृत्तीमुळे पर्यावरणाचे संतूलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरुकता न झाल्यास येणार्‍या काळात गंभीर समस्यांना समोरे जावे लागेल म्हणून आता सर्वांसाठी पर्यावरण संतूलन राखणे काळाची गरज बनत चालले आहे असे प्रतिपादन प्रा.धनंजय डवरे यांनी केले. ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्य धनगर समाज संघटना राजुराच्या वतीने खंडोबा देवस्थान राजुरा येथे स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज स्थानिक खंडोबा देवस्थान येथे स्वच्छता अभियान तसेच वृक्षारोपण करण्यात आले. समाजबांधवांनी परिसराची स्वच्छता करत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. 

याप्रसंगी धनगर समाजाचे सचिव प्रा. धनंजय डवरे, गोपाळ बुरांडे, बंडू पोतले, दिनेश पोतले, नंदकिशोर काळे, प्रशांत ढवळे, सचिन झाडे, द्रौपदी पोतले, वनिता उराडे, संध्या ढवळे, प्रणाली तुराळे व युवक व महिलांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदवून वृक्ष लागवड करत संगोपनाची जबाबदारी घेतली. 









Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top