- रामपूर - कवठाला मार्गावर ट्रकचालकाचा धुमाकूळ
- भरधाव ट्रक चालविणे, कट मारणे नित्याचीच बाब
राजुरा परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोळीच्या खुल्या व भूगर्भातील कोळसा खाणी आहे. याठिकाणी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरु असते. राजुरा-गोवरी-साखरी मार्गावर बहुतांश वाहतूक हि कोळसा वाहतुकीची आहे. राजुराकडून चिंचोलीकडे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३४ बी. क्यु. २३२१ जात असलेल्या पंढरी ताजणे मु. चिंचोली यांना त्यामागून गोवरी डीप येथे कोळसा भरण्याकरिता जात असलेले ट्रक क्रमांक एम एच ३४ ए व्ही. २७०२ या वाहनाने रेल्वे क्रॉसिंग जवळील वळण रस्त्यावर धडक दिली असता पंढरी ताजणे यांच्या पायाला जबर मर लागला असून त्यांना उपचाराकरिता राजुरा येथिल दवाखान्यात दाखल करण्यात आले. धडक लागताच ट्रक चालक फरार झाला आहे. यावेळी काही लोकांनी ट्रकच्या कॅबिन मध्ये बघितले असता पूर्ण ट्रकचे कॅबिन मोठ्या दगडाने भरून होते. कॅबिन मध्ये इतके दगड का हा तपासाचा विषय असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
यावेळी माहिती मिळताच शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, रामपूर ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांनी धाव घेऊन जखमींना दवाखान्यात पोहोचविण्यास मदत केली व नुकसान भरपाई भरपाई देण्याची मागणी केली. परिसरातून अवैध कोळसा वाहतूक सुरु असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली असून समोरील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.