Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मायकालपुर या छोटयाश्या गावात गोंडीयन संस्कृती जोपासणाऱ्या सल्लाशक्ती चिन्हाचे उदघाटन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
समाजातील युवकांनी येणाऱ्या काळात आदिवासी संस्कृती जोपासण्याची गरज शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी काेरपना - तालुक्यातील मायकालप...

  • समाजातील युवकांनी येणाऱ्या काळात आदिवासी संस्कृती जोपासण्याची गरज
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
काेरपना -
तालुक्यातील मायकालपुर या छोट्याश्या अशा गोंडीयन संस्कृती जोपासणाऱ्या खेडेगावात मोठ्या थाटामाठात सल्लाशक्ती चिन्हाचे उदघाटन समारोह संपन्न झाला. कार्यक्रमाच्या नियोजना नुसार प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत सल्लाशक्ती यांच्या भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सल्लेगागरा शक्ती स्थळावर प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मुठपुजा व गोंडी सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले.

यावेळी भव्य सभेला तसेच पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ग्रा.पं.कढोलीचे माजी सरपंच विनायक पा. डोहे, दत्ता मसे, ग्रा.पं कढोलीच्या सरपंच निर्मलाताई क. मरस्काेल्हे, ग्रा.पं. सदस्या गिताताई जुनघरी, उपसरपंच सिताताई बा. पंधरे, ग्रा.पं. सदस्या आवाळपुर भाऊरावजी पा. कुळमेथे, गावपाटील

तुळशिरामजी पा.पंधरे, लक्ष्मण पा.गेडाम, शंकर पा.गेडाम आदि मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर सल्लाशक्ती चिन्हाचे अनावरण पुष्पमाला व दीपप्रज्वलीत करुन करण्यात आले. त्यानंतर आयोजीत सभेला मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजन समीतीचे अध्यक्ष बाळकृष्ण पा. पंधरे, मंगेश पंधरे, राकेश पंधरे, मारोती पा. गेडाम, संपत पा. पंधरे, सिंगाजी पा. गेडाम, राजेंद्र किन्नाके, संदीप किन्नाके व मायकालपुर येतील आयोजन समीतीने अथक परिश्रम घेतले. सुञसंचालन मंगेश पंधरे यांनी केले तर आभार बाळकृष्ण पा. पंधरे यांनी केले. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top