Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सराफा असोसिएशनची बैठक संपन्न - नवीन कार्यकारिणी घोषित भरत शिंदे अध्यक्ष तर सचिवपदी विजय चांडक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - आज 20 जून रोजी चंद्रपूर सराफा असोसिएशन ची बैठक  स्थानिक रूचिदा हॉटेल मध्ये संपन्न झाली. या बैठक...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

आज 20 जून रोजी चंद्रपूर सराफा असोसिएशन ची बैठक  स्थानिक रूचिदा हॉटेल मध्ये संपन्न झाली. या बैठकीत BSI हॉलमार्किंग या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. BSI हॉलमार्किंग काय याबद्दल संपूर्ण माहिती राजेंद्र लोढा यांनी दिली. सराफा व्यावसायिकांना येणाऱ्या संभावित अडचणीबाबत सुद्धा बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये उपस्थित सदस्यांमधून निवडणुकीद्वारे नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली यात जिल्हाध्यक्षपदी राजेंद्रजी लोढा यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच या सभेमध्ये चंद्रपूर शहराची कार्यकारीणी घोषित करण्यात आली यात अध्यक्ष - भरत शिंदे, उपाध्यक्ष - ओम सोनी, सचिव - विजय चांडक, सहसचिव - आशु सागोळे, कोषाध्यक्ष - रोशन कोठारी, सल्लागार समिती - सत्यम सोनी, राजेंद्र लोढा, कार्यकारिणी सदस्य - भिवराज कुकरा (सोनी), संजय सराफ, नितेश लोढीया, प्रमोद लूनावत, मनोज डोमाडे, विनय जैन यांची सर्वसंमतीने नियुक्ती करण्यात आली.  

बैठकीत चंद्रपूर शहरातील बहुसंख्य सराफा व्यापारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सुभाष शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद लुनावत होते. माजी अध्यक्ष सत्यम सोनी यांचे मार्गदर्शनात हि बैठक पार पडली. संचालन राजेंद्र लोढा यांनी तर आभार विजय चांडक यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top