- शिष्टमंडळाने घेतली भेट, समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा
चंद्रपूर -
घूग्घूस येथे तेलगू समाज भवनासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याबदल तेलगू समाज बांधवांच्या वतीने आज आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी समाजातील विविध प्रश्नांवरही आमदार किशोर जोरगेवार यांच्यासोबत चर्चा केली तसेच बल्लारपूरातही तेलगू समाज भवन तयार करण्याची मागणी केली. यावेळी कल्लाकार मल्लारप, घूग्घूस तेलगू समाजाचे अध्यक्ष राम्मीला आनंद, शंकरया काडसी, सुनिल मेद्दपल्ली, अरुन मीटपल्ली, बल्लारपूर येथील लक्ष्मी नरसिंह बॅंकेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचूवार, बल्लारपूर नगर परिषदेचे नगर सेवक स्वामी रायबरम, जेष्ठ नागरिक जी.डी प्रथुदास, नानाजी बुंदेल, श्रिनिवास, मिलींद दिंडेवार आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूरात तेलगू समाज बांधवांची संख्या मोठी आहे. येथील विकासात या समाजाचा मोठा वाटा राहला आहे. त्यामूळे या समाजाच्या समस्यांकडे विषेश लक्ष देण्याची गरज असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मटले आहे. दरम्यान घूग्घूस येथे तेलगू समाज भवनासाठी खनिज विकास निधीतून ३० लक्ष रुपयांचा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. नुकतेच या कामाचे भूमीपूजन आ. जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले आहे. त्यांनतर या कामाला आता सुरवात करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी तेलगू समाज भवनासाठी निधी उपलब्ध करुन देत त्याचे काम सुरु केल्या बदल आज चंद्रपूर, घूग्घूस, आणि बल्लारशाह येथील तेलगू समाज बांधवांनी आमदार किशोर जोरगेवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचा शाल, श्रिफळ देवून सत्कार केला. तसेच बल्लारपूरातही तेलगू समाज भवनाची गरज असल्याचे बोलून दाखवले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी घूग्घूस नंतर चंद्रपूरातील लालपेठ येथेही तेलगू समाज भवन तयार करणार असल्याचे यावेळी सांगीतले. तसेच तेलगू समाजाचे प्रश्न प्राथमिकेतेने सोडविण्याचे आश्वस्त केले आहे. यावेळी समाजातील विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.