Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कुपोषण मुक्तीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - आमदार ...

  • सेवा कलश फाऊंडेशन आणि बाळु संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २५ कुपोषित बालकांना सकष आहार भेट
अनंता गोखरे - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांच्या सामाजिक दायित्वातून सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजित धोटे यांच्या पुढाकाराने आणि बाळु संस्थेच्या माध्यमातून राजुरा तालुक्यातील राजुरा ग्रामीण आणि शहरी भागातील २५ कुपोषित बालकांना प्रत्येकी एक या प्रमाणे बाळु साहित्य किट भेट देण्यात आली. या प्रत्येक किट मध्ये २ किलो मोट, २ किलो चना, २ किलो मुंग, २ किलो बरबटी, २ किलो वटाना, १ किलो नाचणी, १ किलो शेंगदाणे, १ किलो गुळ हे बाळु साहित्य भेट देण्यात आले. 

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हाणून कायम सेवा कार्य करीत असून क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा आपण करीत राहणार आहोत. शिक्षण, आरोग्य, कृषी व इतर सर्व क्षेत्रात राजुरा विधानसभा क्षेत्राला प्रगती पथावर कायम ठेवू. संतुलित समाज हे एक आदर्श स्वप्न आहे. यासाठी सातत्याने शासकीय स्तरावर प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. मात्र तरीही काही उणीवा राहून जातात. कुपोषण मुक्त समाजासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे काळाची गरज आहे. त्यामुळे या कार्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे, जि प सदस्य मेघाताई नलगे, उपसभापती मंगेश गुरणुले, काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, पं स सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, आदी मान्यवर उपस्थित होते. राजुराचे सीडीपीओ वैशाली सटाले, गोंडपिपरीचे शरद पारखी, कोरपनाचे गणेश जाधव यासह कुपोषित बालक, त्यांचे आईवडील, अंगणवाडी सेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. प्रास्ताविक सेवा कलश फाऊंडेशन राजुराचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत धोटे यांनी तर आभार प्रदर्शन बाळु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा विस्तार अधिकारी अमित महाजनवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अनमोल सहकार्य केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top