- मोफत पाठ्यपुस्तक, वृक्षारोपन व सभासद नोंदणी चे आयोजन
सर्वप्रथम छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरीत्रावर आपले मनोगत व्यक्त केले. नेफडो च्या तालुका उपाध्यक्षा रजनी शर्मा यांच्या तर्फे शिवाजी हायस्कूल चूनाळा येथील इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्थिनी करिता मराठी व्याकरण चे पुस्तके मोफत देण्यात आले. त्यानंतर बालोद्यान परिसरात वृक्षारोपण आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची सभासद नोंदणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन पूर्वा देशमुख यांनी, प्रास्तावीक बादल एन. बेले नागपूर विभाग सचिव, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी तर आभार सूनैना तांबेकर, तालुका संघटिका यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजश्री उपगण्लावार, वर्षा कोयचाडे, वर्षा वैद्य, प्रतिभा भावे, माणिक उपलंचिवार, ललिता खंडाळे, कृतिका सोनटक्के, संदीप आदे, आशीष करमरकर, नागेश उरकूडे, दीवाकर गौरकार, नितीन जयपूरकर, प्रदीप भावे, उमेश लढी, सूर्यभान गेडाम आदिंनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.