Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाला धक्‍का लावाल तर खबरदार – आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूरात चक्‍काजाम आंदोलन यशस्‍वी शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारने एक...

  • आ. मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूरात चक्‍काजाम आंदोलन यशस्‍वी

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाविकास आघाडी सरकारने एका मागोमाग एक ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, मराठा समाजाचे शैक्षणिक आरक्षण तर अनुसूचित जातीचे पदोन्‍नतीतील आरक्षण संपविण्‍याचा घाट घातला आहे. या आधीच्‍या भाजपा-शिवसेना युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व अनुसूचित जातीचे पदोन्‍नतीतील आरक्षणही सुरू होते. परंतु तीनही आरक्षणांबद्दल न्‍यायालयांमध्‍ये व्‍यवस्‍थीत बाजू न मांडल्‍याने ही सर्व आरक्षणे न्‍यायालयांनी रद्द केली. ही या सरकारची संवेदनहीनता आहे व याचा मी तिव्र शब्‍दात निषेध करतो, अशी भावना लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूरात ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाच्‍या मागणीसाठी आयोजित चक्‍काजाम आंदोलनात बोलताना व्‍यक्‍त केली. भारतीय जनता पार्टी ओबीसी समाजाच्‍या पाठीशी भक्‍कमपणे उभी आहे अशी ग्‍वाही आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. गाव स्‍वावलंबी व्‍हावे व सर्व समाजाचा सारखा विकास व्‍हावा याकरिता ही सर्व आरक्षण प्रणाली लागू झाली होती परंतु शासन या सर्व व्‍यवस्‍था मोडीत काढायला निघाल्‍या आहेत असे दिसते, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.


चंद्रपूर जिल्‍हा भाजपातर्फे आज ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्‍हा देण्‍याच्‍या मागणीसाठी पडोली चौकात चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात आले. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, कुठल्‍याही समाजाला न्‍याय देण्‍यास हे सरकार असमर्थ आहे अशी कृती सरकार स्‍थापन झाल्‍यापासून यांनी केली आहे. याकरता न्‍यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्‍याची मागणी भाजपाने केली आहे. आणखी एक महत्‍वाची घोषणा करताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले की १९ जुलैला महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषदांमध्‍ये अतिरिक्‍त ठरलेल्‍या ओबीसी जागांसाठी होणा-या पोटनिवडणूकांमध्‍ये भाजपा महाराष्‍ट्र सर्व जागी ओबीसी उमेदवारच उभे करेल व या दृष्‍टीने ओबीसी समाजाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न करेल.

याप्रसंगी बोलताना भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी ओबीसी समाजाच्‍या राजकीय आरक्षणाविषयी विस्‍तृत माहिती दिली. या आरक्षणाने सामाजिक समतोल कसा राखला जाईल या विषयी सुध्‍दा त्‍यांनी आपले मत व्‍यक्‍त केले. याप्रसंगी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सुध्‍दा यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन नामदेव डाहूले यांनी केले. याप्रसंगी माळी समाजाचे नेते बबनराव वानखेडे प्रामुख्‍याने मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, महानगर महासचिव राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, रवि गुरनुले, ओबीसी मोर्चा महानगर अध्‍यक्ष विनोद शेरकी, महिला मोर्चा अध्‍यक्षा अंजली घोटेकर, महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार, उपाध्‍यक्षा प्रभा गुडधे, युवा मोर्चा अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, तुषार सोम, नगरसेवक संजय कंचर्लावार, प्रदिप किरमे, देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, राहूल घोटेकर, नगरसेविका छबू वैरागडे, सविता उराडे, शिला चव्‍हाण, वनिता डुकरे, शितल गुरनुले, सविता कांबळे, सुरज पेदुलवार, प्रज्‍वलंत कडू, प्रमोद क्षिरसागर, सुनिल डोंगरे, विठ्ठलराव डूकरे, रवि लोणकर, घुग्‍गुस भाजपाध्‍यक्ष विवेक बोढे, हेमंत उरकुडे, निता चौधरी, अनिल डोंगरे, सुर्यकांत कुचनवार, डॉ. गिरीधर येडे, मनोरंजन रॉय, किरण बुटले, विजय आगरे, अजय चार्लेकर, शोभा पिदुरकर, दुर्गा बावणे, आशिष वाढई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी जोरदार घोषणा देत महाआघाडी सरकारचा निषेध केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top