Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: डेल्टा प्लससाठी केंद्राची नवी गाइडलाईन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
​​​​​​​टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरण वाढवा निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करा 8 राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट सरकारच्या गाइडलाईनमधील महत्त्व...

  • ​​​​​​​टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरण वाढवा
  • निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करा
  • 8 राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट
  • सरकारच्या गाइडलाईनमधील महत्त्वाचे मुद्दे
  • वाचा सविस्तर....
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डेल्टा प्लस व्हेरिएंटसाठी नवीन गाइडलाईन जारी केली असून देशातील 8 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रिय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबत 8 राज्यातील मुख्य सचिवांना पत्र लिहले आहे. यामध्ये राज्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटला रोखण्यासाठी कडक पाऊले उचलायला सांगितले आहे.

देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रकरणे वेगाने वाढत आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाची गती वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने संबंधित राज्यांना दिले आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडूचा राज्यांचा समावेश आहे.

या राज्यांच्या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

  • तामिळनाडू - मदुरै, कांचीपुरम आणि चेन्नई
  • राजस्थान - बीकानेर
  • कर्नाटक - म्हैसूर
  • पंजाब - पटियाला आणि लुधियाना
  • जम्मू-काश्मीर - कटरा
  • हरियाणा - फरीदाबाद
  • गुजरात - सुरत
  • आंध्र प्रदेश - तिरुपती

सरकारच्या गाइडलाईनमधील महत्त्वाचे मुद्दे

  • ज्या राज्यांत किंवा जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहे, तेथे गर्दी टाळण्यासाठी व लोकांच्या हालचालीला नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जाव्यात.
  • ज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस प्रकरणे आढळली आहेत, त्या ठिकाणी त्वरित कंटेंटमेंट झोन तयार केले जावेत. त्यासोबतच निर्बंधांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
  • कोरोनाबाधीतांचे नमुने तातडीने भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक कन्सोर्टिया (INSACOG) च्या प्रयोगशाळांमध्ये पाठवावेत.

भारतात डेल्टा प्लसचे 51 प्रकरणे
सरकारी आकड्यानुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 51 प्रकरणे आहे. त्यामुळे देशातील 8 राज्यातील 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्रात आढळले असून येथे रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यानंतर मध्यप्रदेश आणि केरळ राज्यांचा समावेश आहे.

डेल्टा प्लसचे तीन वैशिष्ट्ये

  1. ते फार वेगाने पसरते.
  2. यामुळे फुफ्फुसांना लवकर नुकसान पोहचते.
  3. मोनोक्लोनल अँन्टीबॉडी थेरपीचा प्रभाव कमी करते.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलास विविध नावे देण्यात आली आहेत. देऊन भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले. B.1.617.2 मध्ये आणखी एक म्यूटेशन K417N झाले आहे. हा व्हेरिएंट यापूर्वीच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमधूनच आहे. यातूनच तयार झालेल्या नवीन व्हेरिएंटला डेल्टा प्लस किंवा AY.1 आणि B.1.617.2.1 असे म्हटले जात आहे. K417N म्यूटेशन झालेले नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरते. यावर व्हॅक्सीन आणि औषधींचा प्रभाव सुद्धा कमी पडतो.

डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

  • डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
  • भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
  • डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
  • जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top