Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दालमिया भारत सिमेंट नारंडा कारखान्यातील कामगारांची पिळवणूक न थांबल्यास आंदोलनाची ठिणगी पेटणार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आजचा फक्त ट्रेलर होता चित्रपट बाकी आहे आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी गडचांदूर - पूर्वाश्रमीच्या मुरली सिमेंटचे अधिग्रहण भारतातील नामांकित...

  • आजचा फक्त ट्रेलर होता चित्रपट बाकी आहे
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
गडचांदूर -
पूर्वाश्रमीच्या मुरली सिमेंटचे अधिग्रहण भारतातील नामांकित दालमिया भारत सिमेंट या उद्योगाने केले. त्यामुळे मुरली सिमेंटच्या कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या परंतु दालमिया सिमेंट व्यवस्थापनाने उद्योग सुरू करून जुन्या सफाई कामगारांना कामावर घेतले नाहीच, पण बाहेर प्रांतातून कामगार आणून त्यांना फक्त तीनशे ते पाचशे रुपये रोजी देऊन ठेकेदाराच्या मार्फत स्थायी स्वरूपाचे काम करून घेतल्या जात आहे. जेव्हा जिल्ह्यातील इतर सिमेंट उद्योगातील स्थायी कामगारांना 35 ते 40 हजार रुपये प्रति महिना, बोनस, राहण्याससाठी घरे, मेडिकल सुविधा व्यवस्थापनाद्वारे पुरवल्या जात आहेत.

सिमेंट लोडिंग विभागात इतर सिमेंट उद्योगातील काम करणाऱ्या कामगारांना वेज बोर्ड नुसार 1350 रुपये रोजी प्रतिदिवस तथा इतर सुविधा देण्यात येत आहे पण दालमिया सिमेंट उद्योगाने जुन्या मुरली सिमेंट उद्योगातील लोडिंग कामगारांना डावलून बाहेर प्रांतातून झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश येथून नवीन कामगार आणून त्यांना फक्त पाचशे रुपये रोजी देऊन कायदे धाब्यावर बसवून त्यांचे शोषण करणे सुरू केले आहे.

दालमिया सिमेंट उद्योगाने जुन्या स्टाईल लोडिंग तथा ठेकेदारी काम करणाऱ्या कामगारांना कामावर रुजू करून घेण्यात यावे ठेकेदारी कामगारांना इतर सिमेंट उद्योग याप्रमाणे 500 ते 550 रुपये प्रति दिवस रोजी देण्यात यावी. लोडिंग विभागातील लोडर पॅकर ऑपरेटर व इतर कामगारांना सिमेंट वीज बोर्ड अवार्ड नुसार 1350 रुपये प्रति दिवस पगार देण्यात यावा जुन्या लोडर कामगारांना कामावर घेण्यात यावे. जुन्या कामगारांना संधी दिल्यानंतर उर्वरित जागांवर पाच ते सात गावातील कामगारांना कामावर घेण्यात यावे. वरील सर्व दलित पीडित शोषित कामगारांच्या समस्या दालमिया सिमेंट उद्योगाने त्वरित थांबवून वरील मागण्यांची पूर्तता न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कामगार नेते म्हणून ओळख असलेले माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील इतर कामगार संघटनांना सोबत घेऊन भरगच्च असा लढा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी कामगार संघटना चे महासचिव श्रीनिवास घाडगे, कार्याध्यक्ष उत्तम उपरे, अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे, महासचिव साईनाथ बुचे, एसीसी सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव देवेंद्र गहलोत, कार्याध्यक्ष करमरकर, अंबुजा सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव अजय मानवटकर, उपाध्यक्ष सागर बल्की, माणिकगड सिमेंट कामगार संघटनेचे महासचिव आर पांडे, उपाध्यक्ष राजेंद्र बिले, पेपर मिल चे पदाधिकारी तारासिंग व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी घरांच्या ऐकून घेऊन हा तर फक्त ट्रेलर आहे चित्रपट बाकी आहे ही वेळ येऊ देऊ नये असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.  

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी आमचा विदर्भच्या फेसबुक पेज लाइक करा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. बरोबर आहे पहिले जुन्या लोकांना तर नंतर नवीन कामगारांना प्रमडेंट भरती केली पाहिजे

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top