Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बामणी फाटा येथे जिल्हा व तालुका पदादिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ भाजपाची राजूरात बाईक रॅली शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - भाजपा च्य...

  • ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ भाजपाची राजूरात बाईक रॅली
  • शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ पुकारलेल्या आंदोलनात आज पंचायत समिती चौक येथून बाईक रॅली काढण्यात आली. रॅली राजूराच्या में रस्त्यावरून जात बल्लारपूर मार्गावरील जात बामणी फाटा टी पाईंट या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. रॅलीत युवक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, भाजपचे पदाधिकारी अरुण मस्की, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, सचिन डोहे, दिलीप वांढरे, वाघुजी गेडाम, भाऊराव चंदनखेडे, संदीप गायकवाड, कैलास कार्लेकर यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरण कारणीभूत असून ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ भाजपच्या वतीने हि रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून राजुरा शहरातील मुख्य बाजार पेठ येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा येथे जिल्हा व तालुका पदादिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज दि. २६ जून ला रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी यानंतर मोठ्याप्रमाणात ओबीसी हक्काचे आंदोलन करण्यासाठी रणनीती आखणार असल्याचे सांगितले असून यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

बामणी फाट्यावरील आंदोलनात प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, माजी आमदार संजय धोटे, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, शहर अध्यक्ष काशीसिंग, भाजयुमो जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, जेष्ठ भाजप नेते सतीश धोटे, जिल्हा महिला अध्यक्षा अल्काताई आत्राम, रेणुका दुधे, निलेश खरबडे व तालुका जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top