Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराष्ट्रात पु्न्हा ऑनर किलिंगची घटना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
२२ वर्षीय तरुणाची हत्या भाऊ आणि वडिलांनी केलं कृत्य रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - यवतमाळमधील चिकणी कसबा येथील विवाहित दाम्पत्...

  • २२ वर्षीय तरुणाची हत्या
  • भाऊ आणि वडिलांनी केलं कृत्य
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -

यवतमाळमधील चिकणी कसबा येथील विवाहित दाम्पत्यावर प्रेमविवाहातून झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा प्रेमसंबंधाच्या कारणावरून तालुक्यातील अंतरगाव येथे युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. समीर शेख छोटु (२२) रा. अंतरगाव असं मृत तरूणाचं नाव असून सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी पवन विजय राठोड (२१) व त्याचे वडील विजय परसराम राठोड (५०) दोघेही रा. अंतरगाव यांनी प्लान करून समीर शेख याची हत्या केल्याची तक्रार मृताचा भाऊ आमिन शेख छोटू (२२) रा. अंतरगाव याने आर्णी पोलीस ठाण्यात दिली.

आरोपी पवन राठोड याच्या बहिणीसोबत समीर शेख छोटू याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून समीरवर आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. आरोपींच्या हल्ल्यात समीरच्या छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याला तत्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींविरूध्द भादंवि कलम ३०२,३४ गुन्हा दाखल करण्यात आला. आर्णी तालुक्यात लागोपाठ दोन 'ऑनर किलिंग' च्या घटना घडल्याने चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, बिट जमादार सतिश चौदार करत आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top