Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वय वर्षे २४, शिक्षण आठवी पास, बुद्धी 'सुपर कम्प्युटर'
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्यांने छापल्या चक्क आठ लाखांच्या नोटा नोटा खऱ्या कि खोट्या ओळखण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही घ्यावे लागले मोठे...

  • आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्यांने छापल्या चक्क आठ लाखांच्या नोटा
  • नोटा खऱ्या कि खोट्या ओळखण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही घ्यावे लागले मोठे कष्ट
  • यूट्युबवरून बनावट नोटा बनविण्याचे प्रशिक्षण
  • बिनधास्त सुरू होती ऐश
  • शेवटी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
वय वर्षे २४. शिक्षण आठवी पास. बुद्धी 'सुपर कम्प्युटर' म्हणावे अशीच. मौजेसाठी त्याने यूट्युबवरून बनावट नोटा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. एक-दोन हजार नव्हे तर तब्बल आठ ते लाख रुपयांच्या बनावट नोटा छापल्या व त्या बाजारातही चलनात आणल्या. बिनधास्त ऐश सुरू होती. अखेर तो साथीदारांसह गुन्हेशाखेच्या जाळ्यात अडकलाच.

सूत्रधार नीलेश राजू कडबे (२४, मलका कॉलनी, समतानगर), मारुफ खान रफीक खान (२४, ताजनगर, टेका) व रवी बेसरे (वय ३४) या तिघांना अटक करण्यात आली. नीलेश हा एका छापखान्यात काम करायचा. त्याला फलके, पुस्तके व पत्रके छापण्याचा अनुभव होता. यातूनच त्याला नकली नोटा छापून आर्थिक चणचण दूर करण्याची कल्पना सुचली. त्याने युट्यूबवरून बनावट नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले. दीड महिने त्याचा अभ्यास केला. त्यानंतर कम्प्युटर, स्कॅनर, प्रिंटर व नोटा छापण्यासाठी लागणारी शाई जमविली. सुरुवातीला त्याने १०० व ५० रुपयांच्या नोटा छापल्या. त्या फळभाजी विक्रेत्यांकडे चालविल्या. नोटा चालनात येत असल्याची खात्री पटताच त्याने मोठ्या प्रमाणात १००, ५० व २० रुपयांच्या नोटा छापायला सुरुवात केली. तो २०, ५०, १०० रुपयांच्याच नोटा छापण्यावर अधिक भर द्यायचा. या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी त्याने मारुफ व रवीलाही सोबत घेतले. तिघांनी बाजारात या नोटा चलनात आणाल्या. नीलेश हा एक हजार रुपयांपर्यंत ऑनलाइन खाद्यपदार्थांची ऑर्डर द्यायचा. खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या डीलिव्हरी बॉयला तो ५० रुपयांची गड्डी द्यायच्या. सुरुवातीच्या दोन व शेवट्या दोन अशा ५० रुपयांच्या खऱ्या नोटा गड्डीत तो टाकून तो बनावट नोटा चलनात आणत होता. तर अन्य दोघे विविध वस्तू खरेदी करून या नोटा चलनात आणायचे. दीड महिन्यापूर्वी कम्प्युटरचे काम असल्याचे सांगून नीलेशने मानकापूर भागात खोली भाड्याने घेतली. येथे त्याने नोटा छापखाना सुरू केला. नीलेशबाबत गुन्हेशाखा पोलिसांना माहिती मिळाली. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किशोर पर्वते व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी छापा टाकून नीलेश व मारुफला अटक केली. मंगळवारी पोलिसांनी त्याचा साथीदार रवीलाही अटक केली. तिघेही ४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहेत. या नोटा ओळखण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांनाही मोठे कष्ट घ्यावे लागल्याची माहिती आहे.

सहकाऱ्याचे लॅपटॉपही चोरी
नीलेश हा ओएलएक्सवर 'शेअरिंग' मध्ये खोली भाड्याने शोधायचा. ती मिळाल्यानंतर सुरुवातीला तो सहकाऱ्याचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर आठ दिवसांनी त्याचे लॅपटॉप, पैसे व मोटारसायकल घेऊन पळ काढायचा. त्याच्याविरुद्ध शहरातील दोन पोलिस स्टेशनमध्ये चोरीचेही गुन्हे दाखल आहेत. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top