- कोरोनाबाधित झाल्यानंतर उपचारासाठी निघालेल्या माओवादी नेत्याला तेलंगणात अटक
- अनेक माओवादी नेत्यांना झाली लागण
- उपचारासाठी निघालेल्या एका नेत्याला अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
बस्तर -
छत्तीसगड राज्यातील बासागुडा-जगरगुंडा-पामेड भागात असलेल्या माओवादी शिबिरात कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर सीपीआय माओवादी संघटनेच्या दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा माओवादी सोबरॉय उर्फ गड्डम मधुकर याला कोरोनावरील उपचारासाठी जाताना तेलंगणात १ जून रोजी अटक करण्यात आली आहे.
माओवाद्यांच्या समुहात करोना विषाणूने धुमाकळू घातला आहे. अनेक माओवादी नेत्यांना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसंच यातील काही नेत्यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहितीही समोर येत आहे.
माओवाद्यांमध्ये कोरोनाबाधितांची रांग लागली!
अटकेनंतर सोबराय याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार माकप माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य कटकम सुदर्शन ऊर्फ आनंद, तिरुपती उर्फ देवजी, हरिभूषण उर्फ लखमा आणि तेलंगणा राज्य समिती सदस्य दामोदर, डी के एस झेड सी चे सदस्य देवेंद्र रेड्डी, कट्टा रामचंद्र रेड्डी, कुंकटी व्यंकटाह, निर्मला, पद्मा आणि काकरला सुनीता यांच्यासह अनेक माओवादी कार्यकर्त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. अटक केलेल्या माओवादी सोबराय यांच्यावर उपचारानंतर या संदर्भात अधिक माहितीसाठी चौकशी केली जाणार आहे.
कोरोनाविषयक माहिती लपवली गेली?
स्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, कोरोना संसर्गापासून माओवादी केवळ काही निवडक ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्थानिक स्तराच्या कार्यकर्त्यांना कोरोना संसर्गासंदर्भात चुकीची माहिती दिली जात आहे. योग्य आणि अचूक माहिती दिल्यास छावणी सोडून जाणार या भीतीने त्यांची दिशाभूल करत असल्याने त्यांना धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे परिसरातील लोकांना कोरोना साथीच्या संसर्गाबद्दल खोटी व अवैज्ञानिक माहिती देताना ग्रामस्थांच्या सभा, मेळावे, सभा आदींना जबरदस्तीने पाठवून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळला जात आहे. माओवाद्यांच्या अशा दुटप्पीपणाचा निषेध करत पोलिस महानिरीक्षक, बस्तर रेंज यांनी परिसरातील रहिवाशांना माओवादी कारवायांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.