Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विनाकारण फिरणाऱ्या १२५ जणांची 'अँटिजेन' चाचणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नाका नं.३ येथे आरोग्य पथक, पोलीस प्रशासनाची संयुक्त तपासणी मोहीम विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण) राजुरा - कोरोनाच्य...

  • नाका नं.३ येथे आरोग्य पथक, पोलीस प्रशासनाची संयुक्त तपासणी मोहीम
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांकेड दुर्लक्ष करून रस्त्यावर निष्कारण फिरणाऱ्यांवर तीव्र कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक नाका नंबर ३ परिसरात आज सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान १२५ जणांना थांबवून त्यांची आरोग्य पथकाकडून अँटिजेन चाचणी करण्यात आली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी डॉक्टर, पोलीस तसेच स्थानिक प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र, त्याला काही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने दिसत आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर सुरुवातीपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही निष्कारण फिरणाऱ्यांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने त्यांची अँटिजेन चाचणी करून पॉझिटिव्ह आढळल्यास सरळ रुग्णालयात दाखल केले जात आहे.

आज पोलिसांनी नका नं. ३ येथे वाहनांची चौकशी केली. या वेळी १२५ जणांना बाहेर फिरण्याचे ठोस कारण सांगता आले नाही. त्यामुळे आरोग्य केंद्राच्या पथकाकडून त्यांची जागेवरच अँटिजेन चाचणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान एक जण पॉझिटिव्ह आढळला. पॉजिटीव्ह ला चंद्रपूर येथील कोव्हिड सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. 

बंदोबस्तादरम्यान अँटिजेन तपासणी मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक पी.आर. साखरे, सहायक फौजदार भासरकर, प्रशांत येडे, पोलीस हवालदार राधेश्याम यादव, पोलीस शिपाई नायक, उमेश रामटेके, हेमंत बावणे, लुटारू सोयाम, सोबतच होम गार्ड तसेच आरोग्य विभागाकडून लॅब टेक्निशियन अवि पचारे, रोहित जामदार व त्यांची मोबाईल टीम यांनी कारवाई केली. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top