Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जातपंचायतींच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करा - आ.किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार जोरगेवार-ओंगले कुटुंबीयांची घेतली भेट आर्थिक मदत करत मुलीच्या उच्चशिक्षणात मदत करण्याचे आश्वासन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्...

  • आमदार जोरगेवार-ओंगले कुटुंबीयांची घेतली भेट
  • आर्थिक मदत करत मुलीच्या उच्चशिक्षणात मदत करण्याचे आश्वासन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -

आमदार किशोर जोरगेवार यांनी ओंगले कुटुंबीयांची आज भेट घेतली असून जातपंचायतींच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या आहे. यावेळी परिवाराला आर्थिक मदत करत एमपीएससी ची तयारी करत असलेल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

जातपंचायतीच्या जाचामुळे ७ बहिणींना आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथे उघडकीस आली होती. गेल्या १५ वर्षांपासून प्रकाश ओंगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार त्यांच्या मृत्यूनंतरही पुन्हा एकदा आड आला. गोंधळी समाजाच्या प्रकाश ओंगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. पदरी ७ मुली आणि २ मुलं आहेत. त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न, कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं, त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला, आर्थिक दंड लावला मात्र प्रकाश ओंगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. अशातच काल त्यांचा मृत्यू झाला. मात्र जात पंचायतीच्या जाचामुळे त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. त्यानंतर ७ बहिणींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला होता या प्रकाराबाबत माहीत होताच आज आमदार किशोर जोरगेवार यांनी ओंगले कुटुंबियांची भेट घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात हि घटना हृदय हेलवणारी असून ह्या बद्दल समाजात जनजागृती करणे महत्वाचे आहे. या घटनेबाबत विधानसभेत प्रश्न मांडणार असून अशी विदारक परिस्थिती अन्य कुठल्याही कुटुंबावर न येण्याकरिता सामाजिक जनजागृती करणार असल्याचे यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी सांगितले. कुटुंबाची आर्थिक अडचण लक्षात घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. या कुटुंबातील जयश्रीला उच्च शिक्षण घेऊन एमपीएससी युपीएससी च्या माध्यमातून प्रशासनात रुजू होवून समाजात पथदर्शक म्हणून कार्य करायचे आहे. यासाठी लागत असलेले आर्थिक सहाय्य आमदार जोरगेवार करणार आहे. तसेच सामाजिक दायित्व स्विकारून  ह्या सामाजिक रूढी परंपरेच्या विरुध्दात जनसामान्यात सकारात्मक बदल घडविन्याकारिता महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक जनजागृती पथनाट्य सादर करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले, सोबतच भारतीय संविधान आणि आपले हक्क याबद्दल माहिती घराघरात पोहोचविण्याकरिता भारतीय संविधानच्या १०,००० प्रति  वाटप करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना फोन करून या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top