Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ताडाळी आणि घुग्गुस येथे रुग्णवाहीकेचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोनाच्या महामारीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब...

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाच्या महामारीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहे त्यातील ताडाळी आणि घुग्गुस येथे देण्यात आलेल्या रुग्णवाहीचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. प्रसंगी ताडाळी ग्राम पंचायत सरपंच संगीता पारखी, डॉ. माधुरी मेश्राम तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. व्यंकटेश भंडारी वैद्यकीय अधिकारी, डॉ. दामिनी थेरे वैद्यकीय अधिकारी, डॉ. अनिल वराटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. परम वाकडकर, रवी पोचमपल्लीवार आरोग्य सेवक व गावातील नागरिकांची उपस्थिती होती

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाने रुग्णसंख्या वाढीमुळे चंद्रपुरातील आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण झाला होता. परिणामी आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णवाहिका जुन्या झालेल्या असून काही नादुरुस्त अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने जिल्हा ठिकाणी हलविण्याच्या दृष्टीने अडचण निर्माण होत होती. हीच अडचण लक्षात घेत महाराष्ट्र शासना तर्फे रुग्णवाहीका जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य  केंद्राकरिता उपलब्ध झालेल्या आहे. त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ताडाळी आणि घुग्गुस येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडला. या रुग्णवाहिकेमुळे सभोवतालच्या परिसरातील  रुग्णांना अद्यावत रुग्णवाहिकेची सेवा प्राप्त होऊन त्यांना तात्काळ उपचार आवश्यक असल्यास इतरत्र हलविता येणार आहे. या पूर्वी जिल्हा खनिज विकास निधीतून २० मोठ्या रुग्णवाहिका वितरीत करण्यात आलेल्या असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत १५ रुग्णवाहिका प्रस्तावित करण्यात आलेल्या आहे. या रुग्णवाहीचे माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गैरसोय टळेल असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top