Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स गोंडपिपरी - जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र असलेल्या धाबा येथे आमदार सूभाष धोटे यांच्या हस्ते रूग्णवाही...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गोंडपिपरी -

जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र असलेल्या धाबा येथे आमदार सूभाष धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले. धाबा परिसरातून मोठ्या प्रमाणात गंभीर आजार असलेल्यांना गोंडपिपरी ग्रामीण रूग्णालयात रेफर केल्या जाते. मात्र सूसज्ज रूग्णवाहीका नसल्याने अनेक अडचणीं रूग्णाना भेडसावीत होत्या. ही समस्या आमदार सूभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी खनिज कल्याण निधीतून सूसज्ज रूग्णवाहीका धाबा आरोग्य केंद्राला मंजूर केली. आज आमदार धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले. 

या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी चकोले, लोणे, एम.बी सिडाम, तालुका काँग्रेस अध्यक्ष तुकाराम झाडे, नामदेव सांगडे, सचिन फुलझले, संतोष बंडावार, जिंतेद्र गोहणे, शंकर येलमुले, दिलीप पुलगमकर उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात आमदार सुभाष धोटे यांनी स्थानिक नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिले. ते सतत नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळेच त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिकता दिली. त्यांनी धाबा आणि परिसरातील नागरिकांसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top