Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरोनाला आपल्या गावापासून दूर ठेवायचे असेल तर लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे - नंदकिशोर वाढई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कळमना येथे लसीकरण शिबिराचे उदघाटन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - सद्य परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी लस हि ढाल आहे. कोरोनाला आपल्य...

  • कळमना येथे लसीकरण शिबिराचे उदघाटन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -

सद्य परिस्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी लस हि ढाल आहे. कोरोनाला आपल्या गावापासून दूर ठेवायचे असेल तर लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन कळमना येथील सरपंच तथा काँग्रेस पार्टी ओबिसी विभाग ग्रामीण चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी कळमना येथे लसीकरण शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले. कळमना येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात लसीकरण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन नंदकिशोर वाढई यांचे हस्ते झाले. 

याप्रसंगी पांढरपौनी उपकेंद्र येथील प्रिया बनसोडे, सामुदायिक आरोग्य अधिकारी शेषराव मांडवकर, आरोग्य सेवक रेखा राऊत, आरोग्यसेविका लोणारे मॅडम, आरोग्य सेविका बटाळकर, आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र देवळा तसेच कळमना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महादेव ताजने, उपसरपंच कौशल्य मनोर कावडे, ग्रामपंचायत सदस्य सुनिता ऋषी उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, प्रियंका मनोज गेडाम, साईनाथ भास्कर पिंपळशेंडे, दीपक भाऊजी झाडे, नारनवरे ग्रामसेवक, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, निंबाळा येथील पोलीस पाटील गोपाल पाल, शाळेचे मुख्याध्यापक दांगोटे सर, निंबाळा चे मुख्याध्यापक भोंगळे सर, गोवारदिपे सर, पेंदोर सर, गोखरे मॅडम, दूध मॅडम तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक महादेव पाटील पिंगे, विठ्ठल वाढई, उद्धव पाटील आस्वले, निलेश वाढई, प्रभाकर साळवे, मंगेश ताजने, शामराव चापले, नानाजी पाटील, आंबील डगले, मनोर कावडे, ग्रामपंचायत शिपाई सुनील मेश्राम, विठ्ठल नागोसे, आशा वर्कर कल्पना शिरसागर, अंगणवाडी सेविका लता शिरसागर तसेच गावातील नागरिक व कोरोना दक्षता व लसीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते. शिबिरात ८३ पैकी ८३ डोज देण्यात आले. 

कोरोना हा छोटासा पण चिवट विषाणू आहे. त्याने आता रूप बदलले आहे. दुसरी लाट अजून गेलेली नाही, तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच पावसाळी आजारही येऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी. मास्क हेच सर्वात प्रभावी लसीकरण आहे. जोपर्यंत संपूर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत मास्क खाली करू नये, असेही आवाहन नंदकिशोर वाढई यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top