Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पैनगंगा नदी घाटावरून अवैध रेतीचे उत्खनन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विनोद चंदनवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी हिमायतनगर (नांदेड) - पैनगंगा नदीकाठावर असलेल्या दिघी, पाळसपूर, कोठा, धानोरा, वॉरंगटाकळी, बोरगडी आदींसह...


विनोद चंदनवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
हिमायतनगर (नांदेड) -

पैनगंगा नदीकाठावर असलेल्या दिघी, पाळसपूर, कोठा, धानोरा, वॉरंगटाकळी, बोरगडी आदींसह अनेक रेती घाटावरून रेतीचे रात्रंदिवस उत्खनन केलं जातं आहे, उत्खनन केलेली रेती पावसाळ्यात विकता यावी यासाठी साठेबाजी केली जात आहे. अनेक ठिकाणी महसुल विभागाने साठे जप्त केले मात्र खडकी बाजार ते पावनमारी रोडवर रेतीचे अवैध साठे जप्त करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. याबाबतचे फोटो खडकी येथील एका युवकाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं तालुक्यातील अनेक गावांतील वाहनधारक शासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने रेतीची चोरी करून चुना लावत आहेत हे उघड झाले आहे. याकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी लक्ष द्यावे अशी मागणी अधिकदराने रेती घेण्याची वेळ आलेल्या नागरिकांनी, घरकूल लाभार्थ्यांनी केली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top