Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पुसद तालुक्यातील येरंडा परिसरात जोरदार पाऊस
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातल्या येरंडा परिसर...

  • रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्यातल्या येरंडा परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्याच जोरदार पावसाने नाले तुडुंब भरून वाहू लागले. पाऊस इतका जोरदार होता कि वाड्याला पूर येते कि काय अशी चर्चा सुरू झाली. जुन महिन्यातील पहिल्याच पावसाने धोधो बरसुन सर्वत्र परिसरात गारावा निर्माण केला. पावसाने तापमानात घट झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाले भरून वाहू लागले आहेत. चांगला पाऊस पडल्या मुळे शेतीच्या कामासाठी शेतकर्यांची लगभग सुरू झाली असली तरी यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला जरी पाऊस पडला असेल तरीही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणीचं नियोजन करावं, असे आवाहन कृषी तज्ञानी केले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top