गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, आवाळपुर, सांगोडा, अंतरगाव, गाडेगाव परिसरात रात्री मुसळधार पाऊस झाला. शेत शिवारासात भरपूर पाऊस झाल्याने कास्ताकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या नांदा गावात रात्री पडलेल्या पावसामुळे एकीकडे शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे तर गरीब झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याची चिंता निर्माण झाली आहे. नांदा गावालगतच्या नाल्याचे पाणी ग्राम पंचायत व श्री प्रभू रामचंद्र महाविद्यालय परिसरात ही पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. ग्राम पंचायत ने पावसापुर्वी नाले सफाई चे काम बरोबर न केल्याने पावसाचे पाणी पुलावर वाहत असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत आणि संजय नीत यांनी ग्राम पंचायत वर केला आहे. काही नागरिकांच्या घरात व शेतात पाणी शिरले आहे. १-२ तास पडलेल्या पाण्यामुळे असे आहे तर मोठा पाऊस झाल्यास काय होईल याची चिंता नाल्याकाठील वस्तीत राहणाऱ्या लोकांना लागली आहे. ग्राम पंचायत ने गावातील सर्व लहान मोठे नाल्याची पूर्णपणे सफाई करून गाव वस्तीतील पाणी सरळ निघून जाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी नाल्याकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.