- ट्रान्सपोर्ट एरियात असलेल्या पुलाचे पाणी दाब मारून शेतात
- बैलजोडी, चारा आणि गोट्यात असलेले बी-बियाणे गेले वाहून
- शिवसेना नेते बबनराव उरुकुडे यांची कंपनी प्रशासनानी आर्थिक मदत देण्याची मागणी
अनंता गोखरे - आमचा विदर्भ
राजुरा -
उपरवाही स्थित अंबुजा सिमेंट कंपनीच्या ट्रान्सपोर्ट नगर एरियात असलेल्या पुलाच्या ब्लॉॅकेज मुळे लगतच्या परिसरातील राजूरकर नामक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुलालगत त्यांचे शेत लागून असून पाणी ब्लॉक झाल्यामुळे पूर्ण पाणी शेतात घुसले. शेतात असलेल्या गोट्यातील बैलजोडी, खत, औषधी, चारापाणी पूर्णपणे वाहून गेले. पुलाचे बांधकाम छोट्या पाईपचे असल्यामुळे दरवर्षी ब्लॉकेज होते. शेतकऱ्यांनी वारंवार कंपनी अधिकाऱ्याला माहिती देऊन पुलाचा पेसेज वाढवण्याची विनंती केली होती. परंतु कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे अतोनाथ नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती घेऊन पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते बबनराव उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित शेतकऱ्याची आर्थिक मदत करून पुलाचे नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. याप्रसंगी केतन बोभाटे, हल तुफान गिरी, साईनाथ पिंपळशेंडे आणि इतर शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.