- पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प
सदर कच्चा रस्त्याचे बांधकाम करीत असताना पाण्याच्या धारेचे प्रवाहाचे आणि वेग यांचे लक्षात न घेता ही तात्पुरती रस्त्याची सोय करण्यात आली होती. बरोबर प्रमाणात मुरूम, गिट्टी सुद्धा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पहिल्याच पाण्याच्या प्रवाहाने भोयेगाँव नाल्यावरील पुल पूर्णतः वाहून गेल्याने चंद्रपूर - गडचांदुर ला जोडणारा मार्ग बंद झाला आहे. सदर मार्गाचे बांधकाम अतिशय कासव गतीने होत असल्याने मार्गातील पूला व्यतिरिक्त कोणतीच कामे पूर्णत्वास गेली नाही. त्यातच पावसाळा सुरू झाला आणि रोडचे काम अपूर्ण असल्याने मार्ग हा चिखलमय झाल्याने वाहने चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सद्या शेतीची कामे जोमात सुरू आहे.शेतकऱ्यांना शेतीविषयक साधनांच्या खरेदी विक्रीसाठी चंद्रपूर घुगुस अश्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी येणे जाणे आवश्यकतेचे आहे. परंतु संबंधित पुल पूर्णतः वाहून गेल्याने या मार्गावरील कवठाडा, नांदगाव, नवेगाव, बाखर्डी, बोरगाव, इत्यादी गावातील लोकांना रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
या मार्गला बांधन्यासाठी बराच कालावधी लागू गेला आहे. आता मात्र पावसाळा लागल्यामुळे लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबधित विभागाचे अभियंता व कंत्राटद्गार यांच्या हेतू परस्पर दुर्लक्षमुळे आणि बेजबाबदारपणामुळे कच्चा पूल वाहून गेला त्यामुळे या मार्गातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरनाची रितसर चौकशी करून कर्तव्यावर कसूर करणाऱ्या बेजबाबदार अभियंता व कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी येथील जनतेकडून मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.