- अन् पथकाला दिले २५ हजारांचे बक्षीस
गेल्या काही वर्षांपासून जुगाऱ्यांसाठी सुरक्षित ठरत असलेल्या हायप्रोफाईल स्वरा फार्म हाउसमध्ये छापा टाकून ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या दरम्यान शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील भारी गावानजीक करण्यात आली. पोलिसांनी यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यांतील 19 जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारी गावाजवळ असलेल्या या स्वरा फार्महाउसमध्ये हायप्रोफाइल जुगार सुरू असल्याची टीप पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली. त्यावरून त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले.
पोलिसांच्या छापेमारीत जुगार खेळ सुरू असल्याचे समोर आले. यावेळी गब्बर मोतेखान पठाण (वय 42, रा. रामनगर, यवतमाळ), आशीष शत्रुघ्न मडावी (वय 33, रा. बेवाडा जि. चंद्रपूर), विनोद कवडू जिवतोडे (वय 40, रा. वणी), मोहमद अफझल ईसराल अहमद सिद्दीकी (वय 28, रा. इंदिरानगर, ता. घुग्गुस), हाफीज खलिल रेहमान (वय 52, रा. गुरुनगर, वणी), मोवीन शेख (वय 30, रा. घुग्गुस), जगदीश गुरुचरण पाटील (वय 37, रा. राजुरकॉलरी), सरफौदीन नन्ने शाह (वय 52, रा. राजुरा), शंकर नानाजी खैरे (वय 29, रा. महाकालीनगर, घुग्गुस), नीलेश बाबाराव झाडे (वय 34, रा. रामनगर, घुग्गुस), सुखदेव दत्तुजी दंदे (वय 37, रा. गिरीजानगर यवतमाळ), शंकर हनुमंत अत्राम (वय 34, रा. चुनाभट्टी, ता. राजुरा), अमीत यशवंत पाटील (वय 32, रा. रामपूर, ता.राजूर), नंदकुमार रामराव खापणे (वय 29, रा. कोलगाव ता. मारेगाव), दीपक शरदराव धात्रक (वय 36, रा. बसस्थानक, यवतमाळ), राहुल संजय चित्तलवार (वय 20, रा. शिवनगर ता. घुग्गुस), निखिल अरविंद कुडमेथे (वय 20, रा. शिवनगर ता. घुग्गुस), आकाश पृथ्वीराज तिवारी (वय 31, रा. बाजोरीयानगर, यवतमाळ), रामेश्वर दत्ताजी व्यवहारे (वय 44, रा. रामकृष्णनगर, यवतमाळ) हे जुगार खेळताना आढळले.
सर्व जुगाऱ्यांविरोधात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ माधुरी बाविस्कर, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी, साहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन करेवाड, गजानन डोंगरे, विशाल भगत, सुमित पाळेकर, नीलेश राठोड, उल्हास कुरकटे, मोहमद भगतवाले आदींच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.