Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सीआयडी ऑफिसर असल्याचं सांगून केला धक्कादायक प्रकार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण घटनेविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - सीआयडी अधिकारी असल्या...

  • नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
  • घटनेविरोधात गुन्हा दाखल करून पोलीस तपास सुरू

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करीत एका भामट्याने बँकेत जात असलेल्या एका व्यक्ती जवळील सोन्याची साखळी घेवुन पसार झाल्याची घटना शहरातील दाते कॉलेज मार्गावर असलेल्या वीर सावरकर चौक परिसरात घडली. मंगळवारी १५ जून रोजी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी सुभाष चव्हाण रा. प्रभात नगर हे आपल्या दुचाकीने मंगळवारी दुपारी बँकेत पैसे भरण्यासाठी जात होते. यावेळी समोरुन अचानक आलेल्या एका व्यक्तीने त्यांना रस्त्यात अडवले. मी सीआयडी अधिकारी आहे, तुम्ही इतके सोने घालुन कोठे जाताय. काढा ते मी सुरक्षित ठेवतो असे सांगत चव्हाण यांच्या गळ्यात असलेली १५ ग्रॅम सोन्याची चेन काढुन मागितली.

यानंतर लगेच ती सोन्याची चैन घेऊन तो तोतया व्यक्ती पसार झाला. आपली सोन्याची चेन लंपास झाली असल्याचे लक्षात येताच सुभाष चव्हाण यांनी तातडीने अवधुतवाडी पोलिसांना फोन करून त्याची माहिती दिली. त्यावरून अवधुतवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. त्यानंतर चोरट्याचा शोध घेण्यात आला मात्र, चोरटा आढळून आला नाही. अखेर याप्रकरणी अवधूत वाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top