Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हाधिकारी यांची उमरखेड तालुक्यातील विविध कोविड सेंटरला भेटी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - दि. 17 जून :  जिल्हाधिकारी अमोल येडगे ...

  • लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
दि. 17 जून :  जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उमरखेड तालूक्यातील चिल्ली, उमरखेड, विडूळ, ढाणकी, बिटरगाव बु., बोरी वन, थेरडी, कोर्टा, फूलसावंगी तसेच महागाव येथे भेट देवून लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा काल आढावा घेतला.

उमरखेड तालुक्यातील यवतमाळ व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांनी उमरखेड तालूक्यास भेट दिली, भेटी दरम्याण प्रथमत: मौजा चिल्ली येथील लसीकरण केंद्रास भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. उपरोक्त मान्यवरांनी तहसीलदार उमरखेड यांचे कक्षात कोरोना लसीकरणाची स्थिती, पिककर्ज वाटप तसेच खत व बियाणे यांचे उपलब्धतेबाबत आढावा घेतला.

जिल्हाधिकारी येडगे यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या उमरखेड उपजिल्हा कोवीड रूग्णालयात 100 बेड तर ग्रामीण रुग्णालय, महागाव येथे 80 बेडपर्यंत क्षमता वाढविण्याच्या सुचना केल्या. तसेच बिटरगाव बु. व बोरी वन येथील नागरीकांशी संवाद साधून कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे व लसीकरणासंदर्भात जनजागृतीपर माहिती दिली. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी ‘माझे लसीकरण, सर्वांचे संरक्षण :: सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ ही मोहीम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय यंत्रणेला निर्देश दिले. 

उपरोक्त दौऱ्यात आ. नामदेव ससाने, जिल्हा आरोग्य अधिकारी फर्लाद चव्हाण, तहसिलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण वानखडे तसेच आरोग्य, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top