Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोघेही वणी  रहिवासी रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहित...
  • दोघेही वणी  रहिवासी
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रभाकर भीमराव उईके वय ६५ रा. आमलोन आणि नामदेव रोडबा वाघाडे वय ६० रा. सोनेगाव अशी या शेतकऱ्यांची नावे असून ते दोघेही वणी तालुक्यातील रहिवासी आहेत.
प्रभाकर उईके यांनी सोमवारी दुपारी विषारी द्रव्य प्राषन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ मुकुटबन येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. नामदेव वाघाडे यांनी रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राषन केले. प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले. मात्र दोन दिवसांनी त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top