Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुकानांचा कालावधी सायंकाळी ७ पर्यंत वाढवा - फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फेडरेशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत दिले निवेदन सोमवार पासुन दुकानांची वेळ वाढवून मिळण्याची शक्यता शशी ठक्कर - विदर्भ प्रतिनिधी...
  • फेडरेशनच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत दिले निवेदन
  • सोमवार पासुन दुकानांची वेळ वाढवून मिळण्याची शक्यता
शशी ठक्कर - विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांनी आज मा. जिल्हादंडाधिकारी यांची भेट घेऊन आस्थापनाची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंत करावी व शनिवारी व रविवारी देखील संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी असे भेट घेत निवेदन दिले. 
माननीय जिल्हा दंडाधिकार्यांनी आमची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. सोमवारपासून दुकाने बंद ठेवण्याची वेळ संध्याकाळी ७.०० पर्यंत होण्याची शक्यता आहे शक्यतो शनिवारी आणि रविवारी देखील व्यवसाय सुरु राहू शकणार आहे याबाबत माहिती आल्यास सर्वच व्यापाऱ्यांना त्याची माहिती देण्यात येईल असे फेडरेशनच्या सदस्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देते वेळी फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रामकिशोर सारडा, राम जीवन परमार, राकेश टहलियानी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top