Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 113 कोरोनामुक्त - 55 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - दि. 18 जून:  गत 24 तासात जिल्ह्यात 113 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट...


श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 18 जून:  गत 24 तासात जिल्ह्यात 113 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 55 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच  4 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 55 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुका 2, बल्लारपूर 7, भद्रावती  3, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 2, सिंदेवाही 0, मूल 6, सावली 0, पोंभूर्णा 2, गोंडपिपरी 2, राजूरा 0, चिमूर 1, वरोरा 3, कोरपना 1, जिवती 1 व इतर ठिकाणच्या 8 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये मुल तालुक्यातील 1 पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 1 पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 1 पुरुष तर गडचांदुर येथील 1 पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 463 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 225 झाली आहे. सध्या 723 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 31 हजार 152 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 43 हजार 880 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1515 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top