Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार - राजू झोडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वनाधिकार्‍यांनी पारंपारिक जबरानजोत शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखल्यास जशास तसे उत्तर देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा आमचा विदर्भ - ब्य...

  • वनाधिकार्‍यांनी पारंपारिक जबरानजोत शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखल्यास जशास तसे उत्तर देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुल -
मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना शेती पासून वंचित करण्याचे कट-कारस्थान वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद  आणि वन अधिकारी करत आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला.

मूल तालुक्यातील पारंपारिक आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी यांना वनअधिकारी शेती करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दावे टाकले असताना व ते प्रलंबित असताना वनाधिकाऱ्यांना शेती करण्यापासून रोखण्याचा अधिकार नाही. वन हक्क कायद्यानुसार जिल्हाधिकारी व तहसीलदार हे वनहक्क समितीचे प्रमुख असतात. जर त्यांच्या आदेशाचे पालन वनअधिकारी करत नसतील तर जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन कायदा स्वतः हातात घेणार असा इशारा राजू झोडे यांनी माननीय तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला. शेतीचे हंगाम सुरू झाले असताना जाणीवपूर्वक वन अधिकारी शेतकऱ्यांना शेतीपासून रोखतात व त्यांना धमक्या देतात. ही बाब अतिशय निंदनीय असून जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम वनविभागाचे अधिकारी करत आहेत.

आज मूल तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन राजू झोडे यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली व सदर शेतीचे दावे प्रलंबित असताना वनाधिकार्‍यांनी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखू नये असा तात्काळ आदेश काढावा अशी मागणी केली. वन विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना जर शेती करण्यापासून रोखत असतील तर स्वतः कायदा हातात घेणार व आपल्या पद्धतीने शेतकर्‍यांना सोबत घेऊन उत्तर देणार अशी तंबी वन प्रशासनाला राजु झोडे यांनी दिली.  

जबरान जोत शेतकऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मूल यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ न्याय दिला नाही तर जबरानजोत शेतकर्‍यांच्या सर्व कुटुंबांना घेऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असा इशारा राजु झोडे यांनी प्रशासनाला दिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top