Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्षाची आत्महत्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - चंद्रपूर तालुक्याचे भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्षांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याच...

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
चंद्रपूर तालुक्याचे भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्षांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज ३० जून रोजी समोर आली. राजेश रामकृष्ण ताजने वय ५२ असे मृतकाचे नाव आहे. 

घुग्घूस पासून जवळच असलेल्या उसगाव येथील ते रहिवाशी होते. आज ३० जून रोजी राजेश ताजने यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घरी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान विषारी द्रव्य प्राशन केले. सदर घटना लक्षात येताच त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

त्यांचा मृतदेह दुपारी उसगाव येथे आणण्यात आला व अंत्यविधी करण्यात आला. ते भाजपाच्या राजकारणात सक्रिय होते. ते भाजपा किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष होते मात्र आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top