Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत असंख्य कामगार मृत देह घेऊन ADM ऑफिसला धडकले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ADM ऑफिस समोर मृतदेह ठेऊन तीव्र आंदोलन व्यवस्थापन बिल्डिंगच्या गेटवर व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा फज्जा कंपनीत तणावाची परिस्थिती ; मोठा पोलीस बंद...

  • ADM ऑफिस समोर मृतदेह ठेऊन तीव्र आंदोलन
  • व्यवस्थापन बिल्डिंगच्या गेटवर व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा फज्जा
  • कंपनीत तणावाची परिस्थिती ; मोठा पोलीस बंदोबस्त
धनराजसिंग शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर येथील प्लांटमध्ये ए.जे. इलेक्ट्रिकल्स मध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करणारे ईश्वर शिलारकर रा. आवारपूर बारा दिवसापूर्वी आपल्या कामावर काम करीत असतांना खाली पडल्यामुळे अपघाग्रस्त झाले होते. त्या अवस्थेत त्यांना चंद्रपूर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची गंभीर अवस्था बघता तेथून त्याला नागपूर ला रेफर करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांचा उपचारांवर झालेले पूर्ण खर्च व मृतकच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी आणि मृतकाच्या परिवारातील एक सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी ही मागणी घेऊन मोठ्या संख्येत येथील कामगार ईश्वर शिलारकर यांचे पार्थिव देह आज सकाळी १० च्या दरम्यान अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट वर आणून ठेवले. आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून मृत्यू देह हलवणार नाही अशी भूमिका कामगार वर्गाने घेतली आहे. कंपनीने आज सकाळपासूनच आपले मेन गेट बंद ठेवले होते. पण दुपारी ३.३० च्या दरम्यान खोळंबलेली वाहतूक सुरळीत व्हावी व दुसऱ्या पाळीतील कामगारांना कामावर येता यावं याकरिता कंपनी व्यवस्थापनाने मेन गेट उघडे केले. मेन गेट उघडताच शेकडो कामगारांनी मृतदेह उचलत ADM ऑफिसला धडकले यामुळे आता व्यवस्थापन बिल्डिंगच्या गेटवरच आंदोलन पोहचल्याने व्यवस्थापन अधिकाऱ्यांचा तूर्तास फज्जा झाला आहे. 

आज सकाळ पासूनचे घटनाक्रम बघता कंपनी व्यवस्थापन समोर तणावाची स्थिठी निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन ने स्थिती चे गांभीर्य बघता कडक पोलिस बंदोबस्त लावला असून कंपनी व्यवस्थापन काय निर्णय घेते यावर सगळ्यांची नजर आहे. बातमी लीहेपर्यंत कामगार संघटनेनेचे नेते आणि कंपनी व्यवस्थापन मध्ये बोलणी सुरू झाली असे वृत्त मिळाले आहे पण आता मेनगेटववरून व्यवस्थापन कार्यालयाच्या समोरच आंदोलन पोहचल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
(बघा व्हिडीओ )

अधिक बातम्या वाचण्याकरिता वाचत राहा www.aamachavidarbha.com 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top