Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आताची मोठी बातमी - अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून कामगारांचे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपनीने दोनी मेन गेट बंद केल्या ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - अल्ट्राटेक सिमेंट लिमिट...

  • कंपनीने दोनी मेन गेट बंद केल्या ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प

धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर येथील प्लांटमध्ये ए.जे. इलेक्ट्रिकल्स मध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करणारे ईश्वर शिलारकर रा. आवारपूर बारा दिवसापूर्वी आपल्या कामावर काम करीत असतांना खाली पडल्यामुळे अपघाग्रस्त झाले होते. त्या अवस्थेत त्यांना चंद्रपूर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. त्यांची गंभीर अवस्था बघता तेथून त्याला नागपूर ला रेफर करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचे काल दुःखद निधन झाले. त्यांचा उपचारांवर झालेले पूर्ण खर्च व मृतकच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात यावी आणि मृतकाच्या परिवारातील एक सदस्याला कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी ही मागणी घेऊन मोठ्या संख्येत येथील कामगार ईश्वर शिलारकर यांचे पार्थिव देह आज सकाळी १० च्या दरम्यान अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मेन गेट वर आणून ठेवले. आपली मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून मृत्यू देह हलवणार नाही अशी भूमिका कामगार वर्गाने घेतली आहे. कंपनीने आपले मेन गेट बंद केले आहे. कंपनी व्यवस्थापन समोर तणावाची स्थिठी निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासन ने स्थिती चे गांभीर्य बघता कडक पोलिस बंदोबस्त लावला असून कंपनी व्यवस्थापन काय निर्णय घेते यावर सगळ्यांची नजर आहे. बातमी लीहेपर्यंत कामगार संघटनेनेचे नेते आणि कंपनी व्यवस्थापन मध्ये बोलणी सुरू झाली असे वृत्त मिळाले आहे पण अजून पर्यंत मृतदेह मेनगेटवरच असल्यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top