Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धान उत्‍पादक शेतकऱ्यांना बोनस तातडीने प्रदान करावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा ना. छगन भुजबळ यांचे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मनोज सोगलकर - ...

  • आ. सुधीर मुनगंटीवार याची अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा
  • ना. छगन भुजबळ यांचे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्‍यात येणाच्या  बोनसची रक्कम अद्याप प्रदान केलेली नाही.. त्‍यामुळे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्‍हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्‍याय होतो आहे. सध्‍या शेतीची  कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्‍यांची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस शासनाद्वारे देण्‍यात येत, नसल्‍यामुळे धान उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले  आहे. येणाऱ्या सात दिवसांच्‍या आत धान उत्‍पादकांना बोनस त्वरित देण्यात यावा अशी मागणी  माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे केली. सदर मागणी तपासून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी दिले.

आज 22 जून रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ना. छगन भुजबळ यांची भेट घेत चर्चा केली व मागणीचे निवेदन सादर केले . यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले , महाराष्‍ट्र शासनाद्वारे धान उत्‍पादक शेतक-यांना एप्रिल महिन्‍यामध्‍येच त्‍यांच्‍या हक्‍काचे बोनस मिळणे अपेक्षित  होते. पण जुन महिन्‍याचा मध्‍य उलटून गेला असताना अद्याप  बोनस मिळालेले नाही.  त्‍याच प्रमाणे शासनाद्वारे खरेदी करण्‍यात आलेल्‍या धानाचे पैसे  सुद्धा ब-याच शेतक-यांना मिळालेले नाही. शासनाद्वारे बिजाई पुरवठा करण्‍यात येतो. तो देखील अनेक शेतक-यांना मिळालेला नाही आहे. त्‍यामुळे गरिब शेतक-यांना खाजगी दुकानातुन महागात बिजाई खरेदी करावी लागत आहे. यामुळे त्‍यांचे आर्थिक शोषण होत आहे. या बोनसपोटी शेतकऱ्यांचे 800 कोटी रू शासनाकडे थकीत आहे ,याकडे त्यांनी छगन भुजबळ यांचे लक्ष वेधले.

सध्‍या शेतीचे कामे सुरु झाले असताना गोरगरिब शेतक-यांना शेतीविषय साहित्‍य खरेदीसाठी व शेतीकामासाठी पैश्‍यांची गरज असते. मात्र ऐन हंगामात शासनाकडून बोनस देण्‍यात आले नसल्‍यामुळे गोरगरिब शेतक-यांवरती अन्‍याय होत  आहे. शासन शेतक-यांची आर्थिक कोंडी करुन त्‍यांच्‍यावरती अन्‍याय करीत आहे. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे .त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस त्वरित देण्यात यावा  असे आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

अधिक बातम्या वाचण्याकरिता वाचत राहा www.aamachavidarbha.com 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top