- यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाई
- जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी समस्या तीव्र
- जिल्ह्यात तब्बल १९१ विहिरींचे अधिग्रहण
- ३८ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ
जिल्ह्यात दरवर्षी पाणी समस्या गंभीर होते. या वर्षी देखील पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केले आहे. गावातील पाण्याची निकड लक्षात घेता खासगी विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १९१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यासोबतच ३८ गावांमध्ये टँकरच्या ५४ फेऱ्या मारत पाणी समस्येचे निवारण केले जात आहे. काही गावांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याने टँकरच्या दोन फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात १९१ अधिग्रहण करण्यात आले असले तरी मालेगाव तालुका याला अपवाद ठरला आहे. या तालुक्यात एकही विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले नाही. जिल्ह्यात पुसद तालुक्यातील २० गावांत, आर्णी ५, यवतमाळ २, कळंब एक, केळापूर, झरी जामणी तालुक्यात प्रत्येकी दोन आणि घाटंजी तालुक्यातील तीन गावांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
या वर्षी मॉन्सून सरासरी इतका बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावातील नागरिकांचे डोळे आतापासूनच आभाळाकडे लागले आहेत. तर दुसरीकडे पाणी प्रश्न जिल्ह्यातील काही गावांमध्ये देखील गंभीर होत चालल्याने त्या गावांमध्ये देखील विहिरींचे अधिग्रहण व इतर उपाययोजना कराव्या लागतील, अशी माहिती प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता सहा बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यात आर्णी तालुक्यातील चार आणि मारेगाव तालुक्यात दोन बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या माध्यमातून गावातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.