राजुरा -
काढोली (बूज) स्थानिक पोवनी-काढोली-हडस्ती ह्या रस्ता डांबरीकरणाचे काम नुकतेच सुरु झाले आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. पोवनी ते हडस्ती रस्त्याचे डांबरीकरणाचे काम फारच मंद गतीने सुरू आहे. रस्त्याचे कामे सुरु असतानाच काही ठिकाणी गिट्टी निघाली आहे. मागील तीन ते चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडली असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी काढोली, पोवनी, हडस्ती येथील गावकऱ्यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.