Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शरद जोशींच्या विचाराने स्वयंसिध्दा सीता पुरस्काराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
व्यवस्थेविरूद्ध लढून समाजाला दिशादर्शक व आदर्श मातांचा सत्कार प्रेरणादायी - ॲड. वामनराव चटप आमचा विदर्भ - दीपक शर्मा राळेगांव (दि. १८ मे २०२...

व्यवस्थेविरूद्ध लढून समाजाला दिशादर्शक व आदर्श मातांचा सत्कार प्रेरणादायी - ॲड. वामनराव चटप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राळेगांव (दि. १८ मे २०२४) - 
        प्रस्थापित पुरूषप्रधान समाजव्यवस्था, घरचा कमावता व्यक्ती निघून गेल्याने कोसळलेला दुखा:चा डोंगर, पाठीमागे मुलांची जबाबदारी अशी अनेक आव्हाने लिलया पेलून त्यासाठी आपली नितीमत्ता ढळू न देता या स्पर्धेच्या युगात आपली मुले केवळ मोठीच केली नाही तर त्यांना उच्चशिक्षित करून संस्कारक्षम बनवून समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला अशा आदर्श मातांचा सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.

        यवतमाळ जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील देशातील एकमेव सीतामातेचे मंदिर असलेल्या रावेरी येथे सीतानवमी निमीत्त आयोजित स्वयंसिध्दा सीता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून ॲड.वामनराव चटप बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन ॲड. दिनेश शर्मा यांनी केले. प्रमुख अतिथी शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, शैलाताई देशपांडे,  स्वभाप प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, सतीश दाणी, रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे, यवतमाळ जिल्हा बँक संचालीका वर्षा तेलंगे, संदीप तेलंगे, विनोद काकडे, महेश सोनेकार, राजेंद्र झोटींग, चंद्रकांत देशमुख, नंदू काळे, वामन जाधव, विजय निवल, अरूण केदार, मुकेश मासुरकर, सुधा पावडे, गजानन झोटींग उपस्थित होते. यावेळी बोलतांना ललीत बहाळे यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शरद जोशींनी सांगितलेला चतुरंग शेतीचा कार्यक्रम अंमलात आणावा, असे आवाहन केले. प्रज्ञाताई बापट यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

        या सोहळ्यात सीतेप्रमाणे संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय नागरिक घडवले अशा राधा जसराज केला आर्वी, नंदा शालिक बुरडकर, चंद्रपूर, विठाबाई बाजीराव मून,चंद्रपूर, लता मनोहर ढवस,भेंडाळा, पुष्पा मोहन काकडे, रावेरी आणि छाया निर्दोष पिदुरकर, गडचांदूर या सहा कर्तबगार महिलांचा शाल, श्रीफळ, साडी, स्मृतीचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने भावपूर्ण सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

        शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी स्वखर्चाने देशातील एकमेव असलेल्या सीतामंदिराचा जीर्णोध्दार करून येथे महिला सन्मान व त्यांच्या माहेरची प्रचिती देण्याचा स्त्युत्य सोहळा सुरू केला. आता भव्य प्रमाणात सीतानवमीला हा सोहळा संपन्न होतो. या सोहळ्यात आत्मनिर्भरता व आत्मसन्मानासाठी महिला सक्षमीकरण, शेतकरी महिला आघाडीची भुमिका याविषयी वैचारिक विचारमंथन झाले. कार्यक्रमात उपस्थित सत्कारमुर्ती महिला भारावून गेल्या तर काहींना आपण केलेल्या कार्याची पावती मिळाल्याबदद्ल आनंदाश्रू अनावर झाले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलाताई देशपांडे व आभारप्रदर्शन मधुसूदन हरणे यांनी केले. संचालन प्रा. लीना शेंडे यांनी केले. या सोहळ्याला महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सारंग दरणे, गणेश मुटे, खुशाल हिवरकर, नामदेव काकडे, मुकेश धाडवे, छोटू काकडे, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट यांनी सहकार्य केले. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

#news #breakingnews #aamchavidarbha #vidarbha #maharashtra 
#chandrapur #rajura #yavatmal #ralegaon #raveri #templeofsitamata
#theonlytempleofsitamatainthecountry #Sitanavami #independent #aarmanirbhar
#Swayamsiddhasita #Awarddistributionceremony #women
#Grampanchayatmember #Mahaprasad #program

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top